
अनंत विचार न्यूज दिनांक 29/82024
दरवाजासाठी सुमारे 30 किलो चांदीचा वापर करण्यात येणार
-कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पायरीच्या दरवाज्याला नांदेड येथील भाविक अरगुलवार परिवारातर्फे चांदी बसवून देणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
शंकर दिगंबर अरगुलवार व नरसिमलू दिगंबर अरगुलवार यांनी कै. दिगंबर तुकाराम अरगुलवार व कै. जनाबाई दिगंबर अरगुलवार या आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ सदरचे काम करून देणार आहेत.
सदरचे भाविक हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त असून नियमित दर्शनासाठी येत असतात ते बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून, सदर दरवाजासाठी सुमारे 30 किलो चांदीचा वापर करण्यात येणार असून, त्याची बाजार मूल्यानुसार सुमारे 26 लक्ष इतकी किंमत होत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.