
अनंत विचार न्यूज 3/8/2024
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा उपक्रम
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग अयोजित “ हेची दान देगा देवा “ या विशेष अध्यात्मिक कार्यक्रमात पंढरपूर येथील कलापिनी संगीत विद्यालयातील एकूण ७० विद्यार्थ्यांनी तबलाआभंग हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर केला. मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. विशेष म्हणजे सांस्कृतिक विभाग कार्यक्रम नियोजन समीतीने या विद्यार्थ्यांसाठी विशेष रंगमंचाची मांडणी केली होती. गायनाचे २० तर तबला वादनाचे ५० विद्यार्थी अशा एकूण ७० विद्यार्थ्यांनी ओंकार स्वरुपा,अभिर गुलाल,राजा पंढरीचा या तीन अभंगांवर आपले सादरीकरण केले. विकास पाटील व प्रियंका पाटील यांनी या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभागाचे संचालक बिभिषन चवरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा विशेष रंगमंच उपलब्ध करुन दिल्याबद्दल सांस्कृतिक विभाग संचालक व संगीत शिक्षकांचे विशेष कौतुक होत आहे.