
anant vichar, anant vichar news, anantvichar news portal, news, pandharpur, pandharpur news, photo, कराड येथे मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न., 15 june 2024
अनंत विचार न्यूज दिनांक 15/62024
सुशिक्षित युवकांनी शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा. – सुधीर पवार.
करकंब प्रतिनिधी
– मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड येथे समाजातील दहावी व बारावीत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील सेवानिवृत्त, क्रीडा, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा मोठ्या थाटामाटात सत्कार सोहळा करण्यात आला.
या प्रसंगी कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव कराड को-ऑपरेटिव्ह बँकेचे सीईओ दिलीप गुरव मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख सुधीर पवार वर्षाताई निंबाळकर पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमोल धोत्रे कराडचे विभागीय जिल्हा अध्यक्ष विजय पवार बाळासाहेब पवार नारायण शिंगाडे सुरेश शिंदे अमोल शिंदे तालुका अध्यक्ष अमर धोत्रे तालुका उपाध्यक्ष महेश अलकुंटे कार्याध्यक्ष सुरेश नलवडे विठ्ठल भोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगता मध्ये वडार समाज हा खूपच प्रामाणिक समाज आहे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकंती करीत असल्यामुळे शिक्षणापासून खूपच दूर आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हाव संघर्ष करा त्याशिवाय आपल्या समाजाची प्रगती नाही म्हणून समाजातील युवकांनी शिकले पाहिजे संघर्ष केला पाहिजे व आपल्या समाजातील लोकांचा विकास करण्यासाठी सुशिक्षित युवकांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन शासनाच्या विविध योजना पोहचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कराड तालुक्यातील मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.