
anant vichar, anant vichar news, anantvichar news portal, news, pandharpur, pandharpur news, photo, शाळेमध्ये मनुस्मृती,मनाचे श्लोक किंवा भगवद्गीता शिवस्वराज्य युवा संघटना खपवून घेणार नाही- संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील, 31 may 2024
अनंत विचार न्यूज दिनांक 31/52024
पंढरपूर प्रतिनिधी/
राज्य सरकारच्या वतीने आता शाळेत भगवद्गीता, मनुस्मृती आणि मनाचे श्लोक शिकवणार असल्याचे समजले?
हे मराठा बहुजनांच्या तरुण पिढीला बाद (निष्क्रिय) करण्याचा कारखाना निर्माण केला जात आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीची शिफारस.
शालेय अभ्यासक्रमात लवकरच भगवद्गीतेचा समावेश करण्याचा विचार एससीईआरटी (राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) करत असल्याची चर्चा आहे. शिवस्वराज्य युवा संघटना मनुस्मृतीचा समर्थन आणि खोटा इतिहास अजिबात मान्य करणार नाही.
महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था म्हणजे मनुवादी आरएसएसचा भटार खाना झाला आहे.त्यांच्या मनात जे येईल ते रकार व अधिकार्यांकडून समाजामध्ये लादण्याचा प्रयत्न करत आहेत.इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीता, (Bhagavad Gita),मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा विचार एससीईआरटी (राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) करत आहे.तिसरी ते बारावीतील मुलांना भारतीय राज्यघटनेचा शिक्षण अपेक्षित आहे संविधानाचा जागर झाला. तरच एक सक्षम नागरिक तयार होईल.
विज्ञानवादी पुरोगामी परिवर्तनवादी धर्मनिरपेक्ष विचार हे शाळेतून शिकवणे गरजेचे आहे.शाळेत सगळ्या जाती धर्माची मुलं राहतात,शिक्षण घेतात त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत.काहीतरी चुकीच्या अभ्यासाची पेरणी जर सरकार रुपी संघ करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. मनुस्मृति, मनाचे श्लोक किंवा शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता आम्हाला मान्य नाही मुलांना घरात शिक्षण द्यावे शाळेत नाही.
शिवस्वराज्य युवा संघटनेचा या प्रक्रियेला विरोध आहे.असे शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील यांनी म्हटले आहे.