
ANANT VICHAR NEWS, 18 march 2024 News, newspaper, page 4, marathi news,newspaper, anant vichar, नागरिकांसाठी मतदार मद, त कक्ष स्थापन 02186-299099 या क्रमांकावर मिळणार सुविधा, मतदार helpline no. नागरिकांसाठी मतदार मद, logo, election commission of India
अनंत विचार न्यूज दिनांक 26/5/2024
कमाल पाचशे मतदारांसाठी एक बूथ बनवावा
मुंबई दि.25 – लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी कमी मतदान झाल्याचे प्रकार घडलेत.मतदान सर्वांना करता आले पाहिजे.मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी एक उपाय म्हणून पोलिंग बूथ ची संख्या निवडणूक आयोगाने वाढवावी. सध्या किमान हजार ते बाराशे मतदारांसाठी एक पोलिंग बूथ ची व्यवस्था असते
त्यात बदल करून कमाल पाचशे मतदार संख्येसाठी एक पोलिंग बूथ या प्रमाणे पोलिंग बूथ तयार करून बूथ ची संख्या वाढवावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवलेंनी आज केली आहे.त्याबाबत चे पत्र ना.रामदास आठवलेंनी भारत निवडणूक आयोगाला ईमेलवर पाठवले आहे.
सध्या एका पोलिंग बूथ मध्ये एक हजार पेक्षा जास्त मतदार असतात त्यांना मतदान करताना अनेक ठिकाणी रांगा लागतात.अनेक ठिकाणी दोन दोन तास रांगेत मतदार थांबतात.त्यामुळे अनेक मतदार कंटाळून रांग सोडून जातात. मतदान करणे टाळतात.त्यातून मतदानाची टक्केवारी घसरते. त्यामुळे मतदान बूथ मध्ये एक हजार पेक्षा जास्त मतदार असण्यापेक्षा ती संख्या कमी करावी.एक हजार ऐवजी किमान पाचशे लोकांसाठी एक मतदान बूथ याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी पाचशे मतदार संख्येचा एक बूथ तयार करून निवडणूक आयोगाने बूथ ची संख्या वाढवावी.
.ही सुधारणा पुढील निवडणुकीत निवडणूक आयोगाने लागू करावी अशी सूचना ना. रामदास आठवलेंनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली आहे. कमी मतदार संख्येचे बूथ तयार करून पोलिंग बूथ ची संख्या वाढल्यास मतदानाची टक्केवारी वाढू शकते अशी सूचना निवडणूक आयोगाला ना.रामदास आठवलेंनी केली आहे.