
ANANT VICHAR NEWS, Logo, News, Pandharpur News, Anant vichar News logo, images, jpeg, jpg
अनंत विचार न्यूज दिनांक 24/5/2024
पंढरपूर दि.21 :- पंढरपूर – निजामाबाद एक्सप्रेस गाडीला धडक लागून एका अनोळखी व्यक्तीच्या डोक्यास जखमी मार लागून जखमी झाला.सदर व्यक्तीस उप जिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल केले परंतु त्यास पुढील उपचारास सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास सबंधितांनी रेल्वे पोलीसांशी संपर्क साधवा असे, आवाहन पंढरपूर रेल्वे पोलीसांनी केले आहे .
अनोळखी मयत व्यक्तीचे वय अंदाजे 35 वर्षे असून , उंची 5 फुट 5 इंच, अंगाने सडपातळ, रंगाने निमगोरा, केस काळे-पांढरे, उजव्या हातावर महादेव व मनगटावर आई असे गोंदलेले, अंगात पांढरे कापड असे मयत व्यक्तीचे वर्णन आहे. संबधीतांनी तसेच ओळखीच्या व्यक्तीने याबाबत पंढरपूर लोहमार्ग पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे .