
ANANT VICHAR NEWS, 11 April 2024 News, रमजान ईदनिमित्त सामाजिक सलोख्याचे दर्शन अभिजित पाटील यांच्यात दिसून आले, marathi news, रमजान ईद, अभिजित पाटील, रमजान, ईद,photo, दुध वट्प, images, jpeg, jpg
अनंत विचार न्यूज दिनांक 11/4/2024
रमजान ईद निमित्त अभिजीत पाटील मित्र परिवार यांच्या वतीने दुध वाटप
पंढरपूर प्रतिनिधी/
मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा रमजान ईद या सणाच्या निमित्ताने दि.११एप्रिल रोजी पंढरपूर शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील मित्र परिवार यांच्या वतीने मुर्शिदबाबा दर्गा, कालिकादेवी चौक येथेदर्गाजवळ वाटप करण्यात आले.
हिंदू मुस्लिम एकोप्याचे शहर म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर शहर तसेच मंगळवेढा याशहरांमधील मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या निमित्ताने इफ्तार पार्टी देऊन सामाजिक कार्यात पाटील यांनी खारीचा वाटा उचलला असल्याचे दिसून आले..
यंदाच्या वर्षी देखील रमजान ईद च्या निमित्ताने अभिजीत पाटील मित्रपरिवार यांच्या वतीने आज दूध वाटपाचे नियोजन करण्यात आले. कालिका देवी परिसरातील त्याचप्रमाणे त्या लगत असलेल्या बागवान मोहल्या मधील मुस्लिम बांधवांनी या दूध वाटपाचा लाभ घेतला. सणानिमित्त दुध जास्त प्रमाणात लागत असल्याने अनेकांची दुध गोळा करण्यासाठी तरंबळ होते परंतू नाम मात्र दरामध्ये दूध उपलब्ध करून दिल्याबद्दल तमाम मुस्लिम बांधव अभिजीत आबा पाटील मित्र परिवाराला धन्यवाद देत आहोत.