
ANANT VICHAR NEWS, 29 march 2024 News, मर्चंट बँकेचे माजी संचालक वसंतराव जवंजाळ यांचे निधन, मर्चंट बँकेचे माजी संचालक, news, pandharpur news
अनंत विचार न्यूज दिनांक 29/3/2024
पंढरपूर, प्रतिनिधी/
पंढरपूर येथील श्रीसंत नामदेव शिंपी समाजातील जेष्ठ नागरिक व दि. पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी संचालक वसंतराव गंगाराम जवंजाळ (वय 88) यांचे वृध्दापकाळाने गुरुवार दि. 28 रोजी दुपारी 1.10 वाजता निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुन, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. घोंगडे गल्ली येथील जवंजाळ चोळखण व मॅचिंग सेंटरचे ते मालक होते. गेल्या अनेक वर्षापासून ते चोळखण विक्रीचा व्यवसाय करत होते. जवंजाळ यांचे घराणे वारकरी संप्रदायीक आहे. ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. संत नामदेव महाराजांचे सेवेकरी राजाभाऊ जवंजाळ महूद मर्चंट बँकेचे शाखा अधिकारी विठ्ठल जवंजाळ यांचे ते वडील होते. गोपाळपूर रोडवरील वैकुंठ स्मशानभूमीत कै. वसंतराव जवंजाळ यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक, व्यापारी व शिंपी समाज बांधव उपस्थित होते.