
माघी यात्रे निमित्त पंढरपुरातील वाहतूक मार्गात बदल:- शिरीष सरदेशपांडे S.P.सोलापुर, ANANT VICHAR NEWS, 14 February 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news
अनंत विचार न्यूज दिनांक 27/3/2024
- सोलापुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, . अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर यांनी लोकसभा निवडणुक सन २०२४ चे अनुशंगाने सोलापुर जिल्हयात अवैध बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे इसमांवर कारवाई करणेचे आदेश दिलेले होते.
त्याअनुशंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनिय माहिती काढुन अवैध विनापरवाना हत्यारे बाळगणारे इसम नामे १. ऋषीकेश संतोष जंगम, रा. के बी कॉलेज समोर, शिवकिर्तीसमोर, पंढरपुर हा कुंभार गल्ली, पंढरपुर येथे २. विनायक रविंद्र शेटे, रा. काशीकापडी गल्ली, पंढरपुर शहर हा काशीकापडी पंढरपुर येथे तसेच ३. अक्षय गौतम वाघमारे रा. बौदधनगर, रामबाग, पंढरपुर शहर हा रामबाग मैदान, पंढरपुर येथे धारदार कोयत्यासारखे अवैध बेकायदेशीर हत्यारे बाळगताना मिळुन आलेने नमुद इसमांवर पंढरपुर शहर पोलीस ठाणेस भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्वये गुन्हे नोंद करून आरोपी अटक करण्यात आली आहे. मागील १५ दिवसांत अवैध हत्यारे बाळगणारे इसमांवर ०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. प्रकाश भुजबळ, सहायक फौजदार राजेश गोसावी, नागनाथ कदम, पोलीस हवालदार शरद कदम, सुरज हेंबाडे, सिरमा गोडसे, बिपीनचंद्र ढेरे, नवनाथ माने, सचिन हेंबाडे, पोलीस शिपाई शहाजी मंडले, निलेश कांबळे, समाधान माने, बजरंग बिचकुले यांनी केली आहे.