
केंद्र व राज्य सरकारने "नामदार जगन्नाथ (नाना) शंकर शेठ मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस" असे नामकरण करावा :- सखल भारतीय सोनार समाज संघटनेची मागणी,ANANT VICHAR NEWS, 14 march 2024 News,arathi news,newspaper, anant vichar
अनंत विचार न्यूज दिनांक 14/3/2024
मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस चा नामदार जगन्नाथ शंकरशेठ मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस असा नामविस्तार करण्यास एवढी दिरंगाई का होतेय का.
नाशिक (प्रतिनिधी) – चार वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक १२ मार्च २०२० रोजी तत्कालीन महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र शासनास मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस चा नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेठ रेल्वे टर्मिनस मुंबई सेंट्रल असा नामविस्तार करण्याचा कॅबिनेट मंत्रिमंडळाचे बैठकीत प्रस्ताव मंजूर करून केंद्र शासनास पाठविला होता.
अजूनही त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यावेळी जे उपमुख्यमंत्री होते, ते विद्यमान महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यावेळी जे पंतप्रधान होते, ते आजही आहेत. आजही ते “मेरा भारत, मेरा परिवार” अशी गारंटी (गॅरंटी, हमी) देत आहेत. असे असताना “भारतीय रेल्वेचे जनक स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थानचे शिल्पकार” असलेले नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस ला देण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव मंजूर करण्यास एवढी दफ्तरदिरंगाई का होत आहे? वादातीत विकासपुरुष म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेठ रेल्वे टर्मिनस मुंबई सेंट्रल या सोनार समाजाच्या मागणीसंदर्भात का दिरंगाई होत आहे, याचे उत्तर संबंधित देतील काय? असा प्रश्न
सकल भारतीय सोनार समाज संघटन चे संस्थापक मिलिंदकुमार सोनार, “युनिव्हर्सल विश्वकर्मा फाउंडेशन” चे राष्ट्रीय उपाध्यक्ष शांताराम दुसाने, सोनार समाजसेवक राजाभाऊ सोनार, “नाना जगन्नाथ शंकरशेट प्रतिष्ठान, मुंबई” चे सरचिटणीस ॲड मनमोहन चोणकर, यांच्यासह विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील सोनार समाज संस्था आणि संघटना यांनी केला आहे.
ज्या व्यक्तिमत्त्वाने स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थानची केवळ विकासस्वप्नेच पाहिली नाहीत, तर ती सिद्धीस नेण्याचा अथक प्रयत्न करून “भारतीय रेल्वे” चा पाया घातला. व्यापार, उद्योग, यांच्या वृद्धीसाठी अतोनात प्रयत्न केले, स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थानात, मुंबईत पहिली मुलींची शाळा “नेटिव्ह गर्ल्स स्कूल” सुरु केली, स्त्री शिक्षणाचा पाया घातला, अशा वादातीत विकासपुरुष नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेठ यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेठ रेल्वे टर्मिनस मुंबई सेंट्रल असा नामविस्तार लोकसभा निवडणुकीपूर्वी करावा, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.