
नागरिकांनी पीएम सूर्य घर योजनेचा लाभ घ्यावा.:- डाक विभागाचे अधीक्षक चंद्रकांत भोर, ANANT VICHAR NEWS, 6 march 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, photo, modi scheme
अनंत विचार न्यूज दिनांक 6/ 3 /2024
पंढरपूर:- (दि.06) पीएम सूर्य घर वीज योजना हि घराघरात पोहचवण्यासाठी पोस्ट खात्यास सर्वेक्षण करण्याची जबाबदारी दिली आहे. यामध्ये पोस्ट खात्याचे कर्मचारी घरोघरी जाऊन सूर्य घर योजनेचे ऑनलाईन सर्वेक्षण करीत आहेत. या योजनेचे सर्वेक्षण दि. 8 मार्च रोजी पर्यंत करण्यात येणार असून, जास्तीत-जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,
असे आवाहन पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक चंद्रकांत भोर यांनी केले आहे.
रुफ टाफ सोलर वीज निर्मिती संच बसवून सौर उर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणे व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये रुफ टाफ सोलर बसवणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॅट पर्यंत प्रयेक किलो किलोवॅटला 30 हजाराचे तर तीन किलोवॅट क्षमतेची यंत्रणा बसविणाऱ्या कुटुंबाला एका किलोवॅटला 18 हजार रुपयाचे तर जास्तीत जास्त 78 हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे.
पंतप्रधान सूर्य घर वीज योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी पोस्ट खात्याचे पोस्टमन व ग्रामीण भागात डाक सेवक हे घरोघरी जाऊन करीत आहेत. पोस्ट खात्यामार्फत केंद्र सरकारच्या पीएम किसान, सुकन्या योजना, महिला समृद्धी योजना अशा विविध योजना घरोघरी पोहचवण्याचे यशस्वी कार्य करत आहेत. सदर योजनेच्या सर्वेक्षणाची अंतिम तारीख 08 मार्च असून या सर्वेक्षणाच्या कामात नागरिकांनी सहयोग द्यावा अथवा नजीकच्या पोस्ट ऑफीसला भेट देऊन माहिती घ्यावी, असे आवाहन पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक चंद्रकांत भोर यांनी केले आहे.