
पंढरपूर शहर पोलिसांची दमदार कामगिरी लाखो रुपयांच्या मुद्देमाल जप्त शहर व तालुका अधिकारी व पोलिसांचे कौतुक, ANANT VICHAR NEWS, 1 march 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, photo, police station news, pandharpur police station, celebration
पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मोटार सायकल चोरी करणारी चोरांची टोळी जेरबंद करुन त्यांचेकडुन १२,७०,०००/- रुपये किंमतीच्या एकूण २६ मोटार सायकली केल्या जप्त.
अनंत विचार न्यूज दिनांक 2/3/2024
पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं ३२/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दि.१६/०१/२०२४ रोजी दाखल असून सदर गुन्ह्याचे तपासकामी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले पंढरपूर विभाग, पंढरपूर व पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार हे तपास करीत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक प्रभाकर भुजबळ व त्यांचे पथकास बातमी मिळाली की,सदरचा गुन्हा हा पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील रेकॉर्डवरील आरोपींनी केला आहे अशी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सदर आरोपीतास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक विश्वासात घेवून तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक केली.
भंडीशेगाव,ता.पंढरपूर येथील आरोपीकडे चोरीच्या मोटार सायकली बाबत कौशल्यपूर्ण चौकशी केली असता चौकशी अंती सदर त्याने पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील १) गुरनं. ३२/२०२४ २) ३७/२०२४३) ७२५/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील मोटारसायकल चोरी केल्याचे सांगुन त्याने मोटर सायकली काढुन दिल्याने त्या गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आल्या असुन तो सद्या न्यायालयीन कोठडीत आहे.
तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं १८०४/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दि. ३०/१२/२०२३ रोजी दाखल असून या गुन्ह्याचे तपासकामी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक प्रभाकर भुजबळ आणि त्यांचे पथकास बातमी मिळाली की,सदरचा गुन्हा हा पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील आरोपीने केला आहे.
सदरचा आरोपी हा अनिल नगर,पंढरपूर येथील आहे. त्यास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकाने सापळा रचून ताब्यात घेवून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सोलापूर जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील मोटारसायकली चोरुन त्या मोटारसायकली यातील साक्षीदार यांना दिल्याचे सांगितले.सदर साक्षीदारांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्या मोटार सायकली आरोपीकडून घेतल्या असल्याचे सांगितले आणि सदर मोटारसायकली साक्षीदारांनी पोलीस ठाणेस हजर केल्या आहेत.
सदर मोटार सायकली बाबत पुढील प्रमाणे गुन्हे आहेत. १) कुर्डवाडी पोलीस ठाणे गुरनं. २७/२०२४ भादविकलम ३७९,२) बार्शी शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ९३६/२०२३ भादविकलम ३७९ ,३) तुळजापुर पोलीस ठाणे गु.र.नं.०८/२०२४, भादविकलम ३७९, ४) तुळजापुर पोलीस ठाणे गु.र.नं. ३८३/२०२३ भादविकलम ३७९, ५) रांजन गांव पोलीस ठाणे पुणे ग्रामीण गु.र.नं. ३५/२०२३ भादविकलम ३७९ ,६) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं.९०८/२०२३ भादवि कलम ३७९ ,७) कोतवाली पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर गु.र.नं.७२०/२०२३ भादवि कलम ३७९, ८) बारामती पोलीस ठाणे गु.र.नं. ११११/२०२३ भादविकलम ३७९, ९) बारामती पोलीस ठाणे गु.र.नं. ४३५/२०२३, भादविकलम ३७९ ,१०) पंढरपुर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. २३/२४ भादविकलम ३७९, ११) मोहोळ पोलीस ठाणे गु.र.नं.५५/२४ भादविकलम ३७९, १२) पंढरपुर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ५५/२४ भादविकलम ३७९ ,१३) मंगळवेढा पोलीस ठाणे गु.र.नं. ८३९/२३ भादविकलम ३७९
ठाणे गु.र.नं. ४४३/२३ भादविकलम ३७९
तसेच ७ मोटार सायकलची चेंसी व इंजिन नंबर खाडाखोड केल्याने माहिती मिळवण्याचे काम चालु आहे.सदर गुन्ह्यात निष्पन्न झालेला ०१ आरोपीस अटक करणे बाकी असुन आरोपीताचा शोध चालु आहे. एकुण २६ मोटर सायकली किंमत रू. १२,७०,०००/- जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस,अधिक्षक प्रितम यावलकर,पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले पंढरपूर विभाग ,पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि प्रभाकर भुजबळ, सपोफौ राजेश गोसावी, सपोफौ नागनाथ कदम, पोहेकॉ/४१९ शरद कदम, पोहेकॉ/१०६३ बिपीनचंद्र ढेरे, पोहेकॉ/३९६ सुरज हेंबाडे, पोहेकॉ/१७८९ सचिन हेंबाडे, पोहेकॉ/४९३ नवनाथ माने,पोहेकॉ/३९८ गोडसे, पोकॉ/२१९० समाधान माने, पोकॉ/१२१६ शहाजी मंडले, पोकॉ/१५१३ बजरंग बिचुकले, पोकॉ/१९०४ निलेश कांबळे, पोकों/योगेश नरळे (सायबर पोलीस ठाणे) यांनी केली असून सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस पोहेकॉ/४९३ नवनाथ माने हे करीत आहेत.