
पंढरपूरकरांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे :- प्रांताधिकारी सचिन इथापे व मुख्यधिकारी डॉ प्रशांत , ANANT VICHAR NEWS, 2 march 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news
पंढरपूर नगरपरिषद कोणतीही दरवाढ नसलेले शिलकी अंदाजपत्रक मंजूर
अनंत विचार न्यूज दिनांक 1/3/2024
पंढरपूर नगर परिषदेच्या सन 2024-2025 या आर्थिक वर्षाकरिता शासन निर्देशा नुसार शिलकी अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले असून मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी नगर परिषदेचे प्रशासक सचिन इथापे यांच्याकडे अंदाजपत्रक सादर केले होते यानुसार नगर परिषदेचे 3 लाख 39 हजार चे कोणतेही दरवाढ नसलेले शिलकी अंदाजपत्रक मंजूर झाले आहे.
यामध्ये शहरातील विविध विकास कामे करणे साठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे व नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्यात या हेतूने पुढील वर्षासाठी खालील प्रमाणे अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे
सन 2024-25 चे अंदाजीत वार्षिक उत्पन्न आरंभीच्या शिलकेसह 224.37 कोटी असून अंदाजित खर्च 224.34 कोटी इतका होईल.या वर्षाखेरीस अंदाजीत 3.39 लक्ष शिल्लक राहील
या मध्ये अंदाजित महसुली जमा 82.55 कोटी होईल व अंदाजीत
महसुली खर्च 99.52 कोटी इतका होईल तसेच अंदाजीत भांडवली जमा 121.60 कोटी इतकी होईल व अंदाजित भांडवली खर्च 124.81 कोटी इतका होईल.
पुढील वर्षांमध्ये खालील प्रमाणे कामासाठी निधी ची तरतूद करण्यात आलेली आहे
स्मशानभूमी सुधारणा 25 लाख गटारे व नाले नवीन 25 लाख सिमेंट काँक्रीट असते 1 कोटी डांबरी रस्ते 1 कोटी नवीन पाईप 30 लाख नवीन इमारत 20 लाख पंधराव्या वित्त आयोग 5 कोटी मागासवर्गीय दुर्बल घटक पाच टक्के 15 लाख महिला बालकल्याण विकास 5% 15 लाख लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलिते तर वस्ती सुधारणा अनुदान 2 कोटी नगरउत्थान राज्यस्तर रस्ते विकास 30 कोटी नगरोत्थान राज्यस्तर पाणीपुरवठा योजना 30 कोटी, जिल्हा स्तर 5 कोटी अल्पसंख्यांक बहुलक्षेत्र विकास कार्यक्रम जिल्हा स्तर 10 लाख तीर्थक्षेत्र विकास आराखडा अनुदान 50 लाख वैशिष्ट्यपूर्ण योजना 5 कोटी अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांसाठी घरकुल योजना 6 कोटी प्रधानमंत्री आवास योजना 5 कोटी विशेष रस्ता अनुदान 5 कोटी विशेष वैशिष्ट्यपूर्ण अनुदान 10 कोटी यमाई तलाव सुशोभीकरण 10 लाख पुतळ्या करता चबुतरा बांधणे 50 लाख उद्यान विकास व सुधारणा 20 लाख दिव्यांग कल्याण निधी 15 लाख,सार्वजनिक मुतारी 5 लाख, जलकुंभ दुरुस्ती 25 लाख ,हातपंप दुरुस्ती 15 लाख याप्रमाणे अंदाज पत्रामध्ये प्रमुख तरतूद करण्यात आले आहेत व इतरही अनेक तरतुदी या अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेले आहेत.
सदरचे अंदाजपत्रक लेखापाल अभिलाषा नेरे व रोखपाल गणेश धारूरकर यांनी तयार केले होत.