
: भारत कृषी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात :- निमंत्रण भगीरथ भालके , ANANT VICHAR NEWS, 22 February 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news
अनंत विचार न्यूज दिनांक 22/2/2024
शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची शेतकऱ्यांना मिळणार मेजवानी
पंढरपूर/प्रतिनिधी
स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचे आयोजन पंढरपूर येथे दिनांक २३,२४,२५,२६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान येथील रेल्वे मैदान येथे करण्यात आले आहे.
बुधवारी रेल्वे मैदान येथे महोत्सवानिमित्त उभारण्यात येणाऱ्या भव्य अशा शामियान्यायची पाहणी शेतकऱ्यांचा उपस्थितीत युवक नेते भगीरथ भालके यांनी केली.
यावेळी कृषी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती कृषी महोत्सवाचे निमंत्रक भगीरथ भालके यांनी दिली.
या महोत्सवामध्ये विशेष आकर्षण असलेला दीड टनाचा गजेंद्र रेडा,पुंगनूर गाय, पंढरपुरी म्हैस, खिलार गाय, गीर गाय, आठ किलोचा कोंबडा व विविध प्रकारचे पक्षी शेतकऱ्यांना पाहावयास मिळणार आहेत. याचबरोबर महिलांसाठी हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय आमदार भारतनाना भालके फाउंडेशन पंढरपूर मंगळवेढा, सहप्रयोजक साईश्री ऍग्रो कंपनी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
या भारत कृषी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार असून यादिवशी खिलार गाई प्रदर्शन, शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी भव्य शेतकरी मेळावा व चर्चासत्र, रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत डॉग शो, कॅट शोचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ६ नंतर महिलांसाठी होम मिनिस्टर व हळदीकुंकू समारंभ कार्यक्रम, सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात चर्चासत्र व सायंकाळी ६ वाजता ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मिळणार आहे.