
विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त, ANANT VICHAR NEWS, 9 February 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, group photo
अनंत विचार न्यूज दिनांक 9/2/2024
पंढरपूर प्रतिनिधी —
ज्येष्ठ शिक्षण तज्ञ पुणे येथील माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयटी जुनियर कॉलेज वाखरी, पंढरपूर येथे विश्वंभर २०२४ उत्साहात पार पडला.
याप्रसंगी एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या अकॅडमीक हेड ज्योती जोटवाणी ,अकॅडमीक कोऑर्डिनेटर अमोल ओव्हाळ ,एच आर प्रीती एक्झाम हेड ओंकार देशपांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरपूर एमआयटी चे प्राचार्य सरदा रेड्डी सर यांनी केले सदर कार्यक्रमांमध्ये एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनात्मक सादरीकरण केले. कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास पंढरपूर शहरातील व तालुक्यातील विशेष प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेले कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, पत्रकार बंधू, शिक्षक, शिक्षिका यांचा शाल,सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच चिचोंडी एम आय टी प्राचार्य बालाजी घुगे, बार्शी एमआयटीचे प्राचार्य राजकुमार गायकवाड ,प्राचार्य रेखा पाटील, सोलापूर एमआयटीचे प्राचार्य स्वप्निल शेठ ,प्राचार्य श् पुराणिक , सांगली एमआयटीचे प्राचार्य वेंकट , प्राचार्य नितीन, तळेगाव एमआयटीचे प्राचार्य चौधरी,आळंदी एम आय टी चे प्राचार्य सदाशिव कुंभार उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी परिश्रम घेतले.