
: आमदार गोळीबार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा - आप, ANANT VICHAR NEWS, 4 February 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, photo, group photo
अनंत विचार न्यूज दिनांक 4/2/2024
उल्हानगर येथील जमिन वाद प्रकरणी पोलीस स्टेशन येथे आलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधीनाच पोलीस यंत्रणेवर विश्वास राहिला नसल्यानेच अशाप्रकारे कायदा हातात घेण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केला असल्याचा आरोप आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. याबाबतचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, किरण साळोखे, सुरज सुर्वे, अभिजीत कांबळे, समीर लतीफ, विजय हेगडे, दुष्यंत माने, मोईन मोकाशी, मयुर भोसले, विलास पंदारे, रमेश कोळी, विवेक भालेराव, राकेश गायकवाड, संजय नलवडे, सद्दाम देसाई आदी उपस्थित होते.