
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी सुनील पाटील यांची निवड, ANANT VICHAR NEWS, 31 January 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, photo
अनंत विचार न्यूज दिनांक 31/1/2024
भाळवणी प्रतिनिधी/
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी भाळवणी (ता. पंढरपूर) येथील सुनिल वामन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे-पाटील यांनी पत्राद्वारे निवडीची घोषणा केली आहे. सुनिल पाटील हे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी भाळवणी ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून काम पाहिले आहे.
सद्या ते सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात संचालक म्हणून कार्यरत आहेत. यावेळी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, सरपंच रणजीत जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी सरपंच रणजित जाधव यांच्या हस्ते सुनील पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सागर चौगुले, निहाल शेख,संदीप जाधव, सुहास सराटे, उत्तम सराटे, मुन्ना इनामदार, प्रशांत माळवदे यांनी जलोष करून अभिनंदन केले.