
पंढरपूर येथे समता सैनिक दल शिबीर संपन्न., ANANT VICHAR NEWS, 25 January 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, photo
अनंत विचार न्यूज दिनांक 25/1/2024
दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी पंढरपूर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा पश्चिम अंतर्गत पंढरपूर शहर या ठिकाणी समता सैनिक दल शिबिर संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन हनुमंत जगताप जिल्हाध्यक्ष अशोक ओहाळ जिल्हा सरचिटणीस हनमंत बंगाळे कोषाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष समाधान जाधव तसेच राहुल सर्वगोड शहराध्यक्ष
कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून दादासाहेब भोसले असिस्टंट स्टाफ ऑफिसर तसेच किरण साबळे लेफ्टनंट कर्नल मच्छिंद्र जगताप जिल्हा उपाध्यक्ष बापू डावरे कंपनी कमांडर लाभले. समता सैनिक दलाचे ध्वजारोहण विद्याताई काटे जिल्हाध्यक्ष महिला रेश्माताई सरोदे सरचिटणीस अरुणाताई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिकाची स्थापना का केली, पूर्वजांचे शौर्याचा इतिहास, संविधानिक अधिकार ॲट्रॉसिटी कायदा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अविनाश चंदनशिवे राजेंद्र सर्वगोड जिल्हा संघटक अण्णासाहेब भोरे
समता सैनिक दल सांगली मोहन गुड दौरु सांगोला तालुकाध्यक्ष स्वप्निल प्रक्षाळे तालुका संरक्षण सचिव कृष्णा सर्वगोड शहर सरचिटणीस सुहास जाधव माधव बाबर दत्तात्रय भोसले दत्तात्रय सरोदे वैभव वाघमारे शंकर वाघमारे नितीन साळवे पांडुरंग कांबळे इत्यादींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा शेवट भारतीय संविधान प्रस्तावना वाचन करून करण्यात आला.