
सोलापूर ग्रामीणच्या 13 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या कुणाला कुठे हलवले .., ANANT VICHAR NEWS, 24 January 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, photo, police news
साप्ताहिक अनंत विचार न्यूज दिनांक 24/1/2024
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 13 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांच्या आदेशाने १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. अक्कलकोटचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा, कुर्डुवाडीचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांची बदली मानव संसाधन व कल्याण शाखा, पंढरपूर मंदिर सुरक्षाचे पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांची बदली जिल्हा विशेष शाखा, बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची बदली बार्शी शहर पोलिस ठाणे याठिकाणी करण्यात आली आहे.
माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांची बदली अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे, बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची बदली नियंत्रण कक्ष, माढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांची बदली सांगोला पोलिस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक निवृत्ती मोरे यांची बदली वैराग पोलिस ठाणे, मानव संसाधन व कल्याण शाखाचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांची बदली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, जिल्हा विशेष सेवा शाखाचे पोलिस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा व पंढरपूर मंदिर सुरक्षाचे पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांची बदली कुर्डवाडी पोलिस ठाणे येथे झाली आहे.