
क्रेडाई पंढरपूरच्या वतीने १९ ते २१ जानेवारी रोजी गृह उत्सव २०२४ चे आयोजन,, ANANT VICHAR NEWS, 17 January 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, photo, group photo
अनंत विचार न्यूज दिनांक 17/1/2024
पंढरपूर प्रतिनिधी/- क्रेडाई पंढरपूर या संस्थेच्या वतीने पंढरपूर शहरातील रेल्वे मैदानांवर दि १९ ते २१ जानेवारी दरम्यान ‘गृह उत्सव २०२४’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या गृह उत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्रज्ञान मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी दि.१९ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.
याप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक व क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या गृह उत्सव प्रदर्शनामध्ये पंढरपुरातील सर्व बांधकाम व्यवसायिकांचे गृह प्रकल्प,फ्लॅट्स, रो हाऊस, ओपन प्लॉट्स यांची माहितीही एकूण ८० स्टॉलच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
बांधकाम क्षेत्राला आवश्यक असणारे सळई, सिमेंट, रंग, सॅनिटरी वेअर आदी साहित्य व गृहकर्ज पुरवठा करणाऱ्या वित्त संस्था या सर्वांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून क्रेडाई पंढरपूरने प्रथमच या गृहोत्सवाचे आयोजन केले आहे. याशिवाय प्रदर्शनामध्ये १० फूड स्टॉलचा समावेश असून प्रदर्शन विनामूल्य असून पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना विविध खाद्य पदार्थाचा आस्वाद घेता येणार आहे.
गृह उत्सव २०२४ साठी मुख्य प्रायोजक कालिका स्टील व सहप्रायोजक कायनेटिक लिफ्ट, विनायक सिरॅमिक्स, बॅंकिंग पार्टनर एचडीएफसी लि. तसेच केबीआर पंप, सुप्रीम पाईप्स, नेरोलॅक पेट, उमा स्टील यांचे सहकार्य लाभले आहे.
पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी या गृह उत्सव प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष अमित शिरगांवकर, उपाध्यक्ष आशिष शहा, सचिव मिलिंद देशपांडे, सहसचिव शशिकांत सुतार, खजिनदार संतोष कचरे,जनसंपर्क अधिकारी विवेक परदेशी यांनी केले आहे. प्रदर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी क्रेडाई पंढरपूर तर्फे आकर्षक बक्षिसे व स्कीम मध्ये बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक सूटही देण्यात येणार आहे.