
अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई, ANANT VICHAR NEWS, 13 January 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, photo, group photo
पंढरपूर दि.12:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने अवैध वाळू व वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी विविध 17 पथकांची नेमणूक केली आहे. भीमा नदी पात्रातील चिंचोली भोसे (खरात वस्ती) व पंढरपूर हद्दीतील कंडरे तालीमच्या पाठीमागे अवैध वाळू व वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली. सदरच्या दोन्ही कारवाई महसूल पथकाने पहाटे 3.30 ते 4.45 वाजताच्या दरम्यान केली.
या पथकात मंडळ अधिकारी विजय शिवशरण, तलाठी प्रशांत शिंदे ,प्रमोद खंडागळे व पंढरपूर मंडळातील सर्व कोतवाल सहभागी होते.