
मंदिर समितीचे सह अध्यक्ष औसेकर महाराज व जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांची होती सुचना:- कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, ANANT VICHAR NEWS, 12 January 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, photo, group photo, ayushyman bharat golden card, pradhan mantri jan aarogya yojana
दर्शनमंडप येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड घेण्याची व्यवस्था
अनंत विचार न्यूज दिनांक 12/1/2024
पंढरपूर (ता.11) :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ राबविली जात आहे. योजनेतून लाभार्थ्याला 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. त्यासाठी ‘ आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड’ घेणे आवश्यक असल्याने मंदिर परिसरामध्ये स्टॉल उभारण्यात यावा अशी सुचना मंदिर समितीचे सह अध्यक्ष .गहिनीनाथ महाराज औसेकर व जिल्हाधिकारी.कुमार आशिर्वाद यांची केली होती.
त्या अनुषंगाने उक्तकामी श्री.संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे जागा उपलब्ध करून देण्याची विनंती तालुका आरोग्य अधिकारी, पंढरपूर यांनी मंदिर समितीला केली होती. त्यानुसार दर्शनमंडप येथे स्टॉल उभारण्यात आला आहे. त्यामध्ये पंचायत समिती पंढरपूर व मंदिर समितीचे कर्मचारी तसेच आरोग्य मित्र नियुक्त करण्यात आले असून, सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी दर्शनमंडप येथील स्टॉलवरून कार्ड काढून घेता येईल अशी माहिती कार्यकारी अधिकारी .राजेंद्र शेळके यांनी दिली.
सदर स्टॉल दिनांक 09 जानेवारी, 2024 पासून सुरू करण्यात आला आहे. त्यास आज मंदिर समितीचे सदस्य. ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोंधले, सदर योजनेचे तालुका समन्वयक नागेश बनसोडे, विभाग प्रमुख भीमाशंकर सारवाडकर यांनी भेट दिली. त्यास आजपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सदरची योजना भारत सरकारची आहे. या योजनेतून नागरिकांना ‘आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड’ मिळते. तथापि, अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे नाव अन्न सुरक्षा योजना व अत्योदय योजनेत समाविष्ट असणे गरजेचे आहे. श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरास दैनंदिन हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात, या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना श्री.संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथील स्टॉलवर उपस्थित राहून कार्ड काढून घेता येईल. तसेच सदर ठिकाणी या योजनेची सर्व माहिती जाणून घेता येईल, त्याचा सर्व भाविक व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.एकनाथ बोंधले, तालुका आरोग्य अधिकारी, पंढरपूर यांनी केले आहे.