
रिपब्लिकन सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सागर गायकवाड यांची फेर निवड , ANANT VICHAR NEWS, 10 January 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, photo, group photo
अनंत विचार न्यूज दिनांक 10/1/2024
पंढरपूर प्रतिनिधी/
रिपब्लिकन सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सागर गायकवाड यांची निवड.
रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेशाची बैठक रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंतराव आंबेडकर, राष्ट्रीय महासचिव संजीवजी बावधनकर, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष समाज भूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबई येथे बैठक संपन्न झाली.
ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा बुलंद करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला.
येणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन सेना उतरणार असल्याने पदाधिकाऱ्यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले.
यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष किरण.घोंगडे यांनी राज्यात नूतन कार्यकारणी निवडण्याचे काम सुरू असून युवकांना काम करण्याची संधी देणार असल्याचे सांगितले. यासाठी प्रदेश युवा आ लघाडीच्या वतीने राज्यभर दौरा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी सागर गायकवाड यांनी समाजातील उपेक्षित घटकांना आंदोलने, उपोषण करून न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने सागर गायकवाड यांची रिपब्लिकन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी फेर नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मान करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सागर गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून वंचित,शोषित आणि पीडित घटकातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणारा असल्याचा विश्वास दिला.
या निवडीमुळे सोलापूर जिल्हा याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.