
अनंत विचार न्यूज दिनांक 31/12/2023
पंढरपूर तालुका अध्यक्षपदी वाखरी येथिल सागर माने यांची निवड शुभेच्छांचा वर्षा
पंढरपूर प्रतिनिधी/
सामाजिक कला क्रिडा सांस्कृतिक अशा आदी क्षेञांमध्ये कायम अग्रेसर असलेल्या जनशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनशक्ती सामाजिक संघटनेतच्या
पंढरपूर तालुकाध्यक्ष पदी खूपसे-पाटील यांनी येथिल सागर माने यांची नियुक्त पञ देऊन निवड केली असून यावेळी माने यांना संघटनेच्या ध्येय धोरणांनुसार सामाजिक कार्य करण्याच्या सुचना देत खूपसे-पाटील यांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर सागर माने यांनीही संस्थापक अध्यक्ष यांचे
यावेळी आभार मानत आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की संघटनेच्या माध्यमातून मी नेहमी सामाजिक कार्य करून पंढरपूर तालुक्यात संघटना मजबूत करेन यावेळी संघटनेचे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते