
अतीवृष्टीच्या मदतीसाठी स्वाभिमानीचा तहसीलवर आक्रमक
अनंत विचार न्यूज दिनांक 7/12/2023
प्रतिनिधी/
सरकारची उदासिनता आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे पुर्णपणे खचुन गेलेले शेतकरी आत्महत्येकडे वळत असल्याने स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या सह शेकडो शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी तहसिल कार्यालयावर आक्रोश केला आहे. संग्रामपूर, जळगाव तालुक्यासह जिल्हाभरात २२ जुलैला महाभयंकर अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
हजारो हेक्टर जमीन खरडून गेली.अनेक गावात पाणी शिरल्याने कित्येकांचे घरे नस्तानाभुत झाले. अशी भयावह परिस्थिती असंताना प्रशासनाने थातुर मातुर पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ तुटपुंजी मदत देण्याच्या हेतूने यंत्रणेने काम केले आहे. खरे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासुन वंचित ठेवले आहेत.तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडुन गेल्या आहेत त्या जमिनीवर ४/५ वर्ष उत्पन्न होत नाही. त्यामुळे त्या जमिनीवर शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेले पिक कर्ज फेडु शकत नाहीत.
अशा खरडुन गेलेल्या जमिनीवरचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे.कापुस-सोयाबीन भाव वाढसाठी राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांनप्रती निर्णायक भूमिका घ्यावी. व मागील आठवड्यात अवकाळी पावसाने तुर,हरभरा व कपासीचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये तत्काळ मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांच्या पिकांना १००% पिक विमा मंजुर करण्यात यावा.संपुर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करा.
राष्ट्रीयकृत बँकेन शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेले होल्ड तत्काळ काढण्यात यावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर,तालुका अध्यक्ष विजय ठाकरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेख सलीम (सध्दाम) विठ्ठल वखारे, विजु काळपांडे, गोपाल तायडे,तेजराव लोणे,विलास तराळे,मनोज देशमुख, विशाल चोपडे,प्रविण येणकर,क्रिष्णा शेजोळे, यांच्या सह शेकडो कार्यकर्ते व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.