अनंत विचार न्यूज दिनांक 29/10/2023
पिलीव प्रतिनिधी रघुनाथ देवकर
सांगली सातारा सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी व शेतमजूर, कामगार, वाहन चालक-मालक व अनेक घटकांच्या विश्वासास पात्र राहुन सर्वांनाच वरदायिनी ठरलेल्या आणि सद्गुरू श्री .श्री. रविशंकर जींच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या राजेवाडीच्या माळरानावर सुजलाम सुफलामतेच्या मार्गावर असलेल्या आणि चेअरमन मा.एन.शेषागिरीराव, व्हा.चेअरमन डॉ बाळासाहेब कर्णवर पाटील,व्यवस्थापकीय संचालक उदयजी जाधव आणि सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली व विकासरुपी उंची गाठलेल्या
सद्गुरू श्री श्री सा.का.लि.श्री श्री नगर(राजेवाडी)या कारखान्यात सन २०२३-२४च्या १२व्या गाळप हंगामाचे आयोजन गुरु प्रभुदेव शिवाचार्य माढेकर महाराज,श्री गुरुभक्ती भूषण हरिहरनंदन महाराज,गुरुमुक्तेश्वर शिवाचार्य महाराज, ह.भ.प.बापूसाहेब देहूकर महाराज यांचे शुभाशिर्वादामध्ये व आटपाडी -खानापुर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.श्री.अनिलभाऊ बाबर यांचे अध्यक्षतेखाली वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सोलापूर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व मा.जि.प.सदस्या सौ.ज्योतीताई पाटील , दैनिक नवा महाराष्ट्र संपादक मा. अर्जुन हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.प्रारंभी ऊस विकास अधिकारी श्री व सौ.सुरेश घाडगे
या उभयतांचे हस्ते श्री सत्यनारायण पूजा करुन श्री .व सौ.अभिषेक थोरवे या उभयतांचे हस्ते चंडीहोम करुन सर्व मान्यवरांचे हस्ते काटा पूजन केल्यानंतर मा.आमदार अनिलभाऊ बाबर आणि सर्व उपस्थितांचे समवेत मोळी पूजनाचा व गळीतहंगामाचा शुभारंभ बैलगाडीच्या मिरवणुकीने व पारंपारीक वाद्यांच्या गजरात व तोफांच्या सलामीत संपन्न झाला.व त्यानंतर मान्यवरांचे हस्ते फटाक्याच्या आतषबाजीत स़द्गगुरू श्री .श्री .रविशंकरजींच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलनाने सभेच्या कार्यक्रमास संचालक श्रीमंत तांदुळकर, मोहन बागल,सौ.उषाताई मारकड, जनरल मॅनेजर रामाराव, एच आर व अॅडमिन मॅनेजर सचिन खटके, सर्व खातेप्रमुख राजेवाडी चे सरपंच प्रशांत शिरकांडे,ईटकीचे सरपंच कृष्णांत सावंत,हिंगणी चे सरपंच सत्यवान ढेकळे,बचेरी सरपंच सौ.राणी गोरड ,शेतकरी संघटनेचे कांतीलाल नाईकनवरे व
अनेक मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीमध्ये सुरुवात करण्यात आली .सभेपूर्वी मान्यवरांचे सन्मान करण्यात आले.तर प्रास्ताविकातुन व्यवस्थापकीय संचालक उदयजी जाधव यांनी कारखान्याच्या सुरवातीपासून सर्व लेखा जोखा सांगत अनेक संकटांना सामोरे जाऊन आपला कारखाना दिवसेंदिवस आपणा सर्वांचे सहकार्यामुळेच प्रगतीची शिखरे गाठत आकाशाला गवसणी घालण्याइतपत मार्गक्रमण करीत असल्याचे सांगुन कारखाना सदैव शेतकरी सभासद यांचे हितच पाहणार असुन दिपावलीतही समाधानी राहण्यासाठी दि.३१आक्टोबरपासुन मागील आलेल्या ऊसाचे रुपये १५०(एकशे पन्नास) प्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडत असल्याची गोड बातमी सर्व संचालकांच्या संमतीने जाहीर केली.शिवाचार्य माढेकर महाराज, शिवाचार्य महाराज,ह.भ.प. बापूसाहेब मोरे महाराज यांनी कारखान्याची वाहवा करीत
शुभाशिर्वाद दिले.तसेच गुरुभक्तीभूषण हरिहरनंदन महाराज यांनी दूरध्वनीवरून शुभाशीर्वाद दिले.मा.आमदार अनिलभाऊ बाबर यांनी तर आपल्या दमदार भाषणातुन चेअरमन एन शेषागिरीराव व संचालक मंडळाचे प्रथमपासूनच कौतुक करीत कोविड काळात केलेली मदत कधीच विसरणार नसुन रस्ते व पाण्याबाबत चे सर्वतोपरी सहकार्य मी निश्चितच करणार असुन कारखान्याच्या माध्यमातून निसर्गाच्या सेवेबद्दल वाहव्वा केली.तसेच ह.भ.प विठ्ठल पाटील यांनीही कारखान्याबाबत प्रशंसनीय उद्गगार काढले. त्याचप्रमाणे व्हा.चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांनीही आपल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणातून शेतकरी सुखी तर आपण सुखी या वाक्याने सुरूवात करुन शेतकरी वर्गाला ऊसाचा दर कधीही दोन हजारांहून पुढे माहीती नव्हता परंतु आपल्या सद्गुरूच्या पहिल्याच गळीत हंगामात दोन हजार पाचशे दर देऊन कारखान्याच्या पहिल्याच हंगामात शेतकरी राजा आपलासा करुन विश्वास प्राप्त केल्याची आठवण करीत चालुवर्षीही शेतकरी वर्ग खुष होईल असाच दर देणार असल्याचे घोषित करुन
आभार प्रदर्शनातून सर्वांना धन्यवाद दिले.सुत्र संचलन केनमॅनेंजर सुनिल सावंत व रघुनाथ देवकर यांनी केले. सदर कार्यक्रमाला सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.