
अनंत विचार न्यूज दिनांक 25/10/23
पंढरपूर २४ श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा ४२ वा गळीत हंगाम शुभारंभ दिनांक २४.१०.२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता विजया दशमीचे शुभमुहूर्तावर मनोरमा सह. बँकेचे चेअरमन श्री श्रीकांत मोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शोभाताई मोरे, एम. एस. सी. बँकेचे माजी सदस्य श्री अविनाश महागांवकर, जकराया शुगरचे चेअरमन श्री विराप्पा जाधव व कारखान्याचे जेष्ठ सभासद श्री हरी पाटील, श्री खंडू सुरवसे, श्री सुखदेव हाके, श्री औदुंबर पोरे, श्री वसंत वाघ, श्री दगडू भोसले, श्री बब्रुवान भोसले आदी मान्यवरांच्या शुभहस्ते व श्री संतोषभाऊ नेहतराव, श्री धनंजयनाना कोताळकर, श्री प्रताप गंगेकर, महादेव धोत्रे, निलेश आंबरे, लखन चौगुले, प्रथमेश पाटील, चंद्रशेखर कोंडूभैरी, सुधीर धुमाळ, नागेश गंगेकर, अरुण कोळी, बालाजी मलपे, संतोष पवार, शिवाजी मस्के, ऋषीकेश भालेराव, काका पवार, आदित्य फत्तेपूरकर व कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील म्हणाले की, गेल्या वर्षी सभासद शेतकऱ्यांनी आशिर्वाद दिल्याने परिवर्तन घडून आले, आम्ही दुसरा गळीत हंगाम यशस्वीपणे चालू करीत आहोत. आपला कारखाना चालू झाल्यामुळे जिल्ह्यात ऊस दराची स्पर्धा निर्माण झाली, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना जास्तीत जास्त दर देणे भाग पडले. यावर्षी आपल्या कारखान्याकडे ३७००० एकर ऊसाची नोंद झाली असून तोडणी वाहतुक यंत्रणा टायर बैलगाडी, डंपींग ट्रॅक्टर व मोठया ट्रॅक्टरचे असे एकुण १००० वाहनांचे करार झालेले आहेत. मशिनरीची देखभाल व दुरुस्ती करुन कारखाना गाळपासाठी सज्ज आहे. तरी सभासदांनी आपला सर्व ऊस इतर कारखान्यास न देता आपल्या श्री विठ्ठल कारखान्यास दिल्यास मागील हंगामा पेक्षा ही जास्त गाळप होईल. आपल्या कारखान्याचा वजन काटा चोख असून जिल्ह्यातील इतर कोणताही साखर कारखाना काट्यावर बोलत नाही.
याप्रसंगी गळीत हंगाम २०२३ २४ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास प्र. मे.टन २५५०/- रुपयेची पहिली उचल जाहीर करण्यात आली. सर्व ऊस उत्पादक शेतकरी व सभासद जास्तीत जास्त ऊस गाळपास देऊन सहकार्य करतील असा विश्वास व्यक्त केला. मागील हंगामात गळीतास आलेल्या ऊसास यापुर्वी प्र. मे.टन २४०० /- रुपये याप्रमाणे अदा केलेले असून दिवाळी सणासाठी उर्वरीत १०० /- रुपयेचा अंतीम हप्ता व सवलतीच्या दरात सभासदांना साखर देण्यात येणार आहे. तसेच कारखाना आर्थिक अडचणीत असतानासुध्दा कर्मचाऱ्यांना दिलासा देणेसाठी व त्यांची दिवाळी सण गोड होणेसाठी १५ दिवसाचा पगार बोनस व ११ दिवसाचा पगार बक्षीस म्हणून देणार असल्याचे सांगितले.
उजनी धरण ६० टक्के भरले असून त्यामध्ये ९५ टी.एम.सी. पाणी साठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाणी साठयातून ४ पाळया सोडणेबाबत शासनास निवेदन देणेत आले होते. सदर निवेदनाची शासनाने दखल घेवून दि.२०.१०.२०२३ रोजीचे कालवा सल्लागार समितीचे मिटींगमध्ये २ पाळ्या पाणी सोडण्याचे नियोजन करुन १ नोव्हेंबरपासून पहिली पाळी सोडणेत येणार आहे. तसेच निरा भाटघर कॅनॉलला टेल टू हेड १ आवर्तन देणेचे व तिसंगी- सोनके तलावातही पाणी सोडणार असल्याचे सांगितले. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता मागेल त्याला शेततळे ही . शासनाची योजना असून त्या योजनेचा लाभ घेणेसाठी जास्तीत जास्ती शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करुन शेततळी पाडून घ्यावेत व शेततळी भरून घेवून सदस्थितीत पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे, पाण्याची बचत करणेसाठी सर्व शेतकऱ्यांनी शेतीसाठी ठिबक सिंचन योजनेचा वापर करावा असे त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. कारखान्यास आर्थिक सहकार्य केलेबद्दल एम.एस.सी. बँक, लोकमंगल बँक, मनोरमा बँक व जकराया शुगर यांचे आभार व्यक्त केले.
सदर प्रसंगी मनोरमा बँकेचे चेअरमन श्री श्रीकांत मोरे बोलताना म्हणाले की, या कारखान्याचा इतिहास फार मोठा असून कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील हे ४ ते ५ साखर कारखाने चालवित असल्यामुळे त्यांच्या अनुभवाच्या जोरावर या कारखान्यास गतवैभव प्राप्त करुन देतील.