
अनंत विचार न्यूज दिनांक 31/07/2025
आपल्या आवडी निवडीचे दाहि दिशातले कर्तबगार नेते, मा.आमदार श्री. अभिजीत आबा पाटील तथा चेअरमन श्री. विठ्ठल स.सा.का. वेणूनगर ता. पंढरपूर यांच्या चांगल्या आपुलकीचे कर्तबगारीवर पुढील प्रमाणे अग्रलेख लिहित आहे. मा. आबासाहेब यांचा ६ महिन्यापेक्षा जादा कालावधीची आमदारकी व तीन वर्षापेक्षा जास्त विठ्ठलच्या चेअरमन पदाचा कालावधी व या दोन्ही कालावधीपूर्वी २०१७ पासून असलेल्या गोड दोस्ती मैत्रीचा अनुभव पुढील प्रमाणे देत आहे.
आपल्या जगाचे मालक श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या परिपूर्ण सांप्रदायिक भक्तीमुळे आपण सर्वजणच पुण्यवान आहोत, याच पुण्याच्या जोरावर आबासाहेबांनी बंद पडून मोडकळीस आलेला विठ्ठल साखर कारखाना नुसता चालूच केला नाही, तर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या ऊस दरातल्या व ऊस वजनातल्या व रिकव्हरीतल्या वाटमाऱ्या व लबाड्या थांबवून जिल्ह्यातल्या ऊसकरी शेतकरी बळीराजाची आर्थिक उंची वाढविण्याच्या ३ सिझन पैकी २ सिझन मध्ये ऊस दर जादा दिला आहे.तिसऱ्या सिझनमध्ये ऊस दराचा दर २८०३ रुपये दिला आहे.त्यातही त्यांनी भारत सरकारचे, महाराष्ट्र सरकारचे, देशाच्या व राज्याच्या सर्वच वित्त संस्थेचे सहकार्य घेणे चालू ठेवून शब्द पाळण्याचे नियोजन काटेकोरपणे विचारात घेतलेले आहेच.आबासाहेबांच्या बाबतीत मी पेपर मिडीयामध्ये व सोशल मिडीयामध्ये गरज पडेल त्यावेळेस माझ्या अडाणी मताने कमी शिक्षणाच्या मानाने मी माहिती दिलेली आहे.त्यातच आबासाहेबांच्या बाबतीत तुर्तास नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्येच आबासाहेबांनी सर्वांच्याच हिताचे ५५ प्रश्न सरकारकडे लेखी स्वरुपाचे ठेवून त्यातले बरेचसे प्रश्न मार्गी लावून नागपूर अधिवेशनामध्येच महाराष्ट्र शासनाने त्यांचे कौतुक करुन दिल्ली साखर संघ,महाराष्ट्र साखर संघ व व्हिएसआय पुणे यांच्या माध्यमातून दोन आठवड्याचा ब्राझील देशाचा दौरा केलेला आहे.त्याचा लाभही आम्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्यास सुरवात झालेली आहे.तसेच मुंबईतील पहिल्या बजेट अधिवेशनामध्ये १९ प्रश्न सरकारपुढे ठेवून त्यातले बरेच प्रश्न मार्गी लावलेले आहेत आणि याच १९ प्रश्नामध्ये नेमकेपणा साधल्यामुळे सरकारने त्यांचा अमेरीकेसाठी अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे.तिसऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी ५९ प्रश्न विचारुन महाराष्ट्रातल्या शहरी व ग्रामीण भागास चांगला न्याय मिळणार हे सरकारच्या ध्यानात आल्यामुळे सरकारचे कर्तबगार सक्षम मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साो. व माजी मुख्यमंत्री व सध्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तसेच कर्तबगार उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साो. व विधान सभेचे विद्यमान सभापती नार्वेकर साो. यांनी त्यांची विधान सभेच्या तालिका अध्यक्ष पदाची नेमणूक केली आहे. आबासाहेब हे पिढ्यानपिढ्या विठ्ठलाचे निस्सिम भक्त असल्याने तुर्तास ते विठ्ठलाच्या पादुका घेवून संत श्रेष्ठ सावतामाळी अरण येथे पंढरपूर येथून सुरवातीपासून १५ ते २० कि.मी.अंतर पायी चालून रोपळेपर्यंत अनेक विसावाच्या ठिकाणी अनेक गावातील कुलदैवत व ग्रामदैवतास प्रदक्षिणा घालून रोपळे पर्यत पालखी बरोबर चालत जावून इतिहासात पहिल्यांदाच नोंद केलेली आहे. अशा आबासाहेबांच्या बाबतीत हा माझ्या कमी बुध्दीच्या विचारातून लेख लिहित आहे तसेच हितचिंतकांना पुढीलप्रमाणे जाणिवही करुन देत आहे.आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते संस्थापक चेअरमन श्री. विठ्ठल स.सा.का. कर्मवीर कै.औदुंबर आण्णा पाटील यांनी तसेच संस्थापक पांडुरंग स.सा.का.कर्मयोगी कै.सु.रा.परिचारक यांनीही तालुक्याला वैभव मिळवून दिलेले आहे. तसेच संस्थापक चेअरमन चंद्रभागा स.सा.का. सहकार शिरोमणी कै. वसंतदादा काळे यांनीही वैभव मिळवून दिलेले आहे. जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व पंचायत समितीचे अध्यक्ष कै. यशवंत भाऊ पाटील यांनीहि वैभव मिळवून दिलेले आहे.अशा अनेक कर्तबागर महान नेत्यांना १ ते २ टक्के लोकांनी चुकीच्या पध्दतीने त्रास दिला.सध्या आबासाहेब हे अर्धा डझन साखर कारखान्याचे व्याप बघत असताना ६ व्या क्रमांकाचे विठ्ठलचे चेअरमन असताना पंढरपूर शहर व ग्रामीण मंगळवेढा शहर व ग्रामीण,माढा शहर व ग्रामीण, त्यातच विचारवंत मतदारांनी दिलेली आमदारकी त्यांच्या कामगिरीमुळे तालुक्याची जिल्हयाची आमदारकी न राहता ती अखंड महाराष्ट्राची आमदरकी झालेली आहे.या दाहिदिशातल्या व्यापामुळे आबासाहेबांची व माझी २०१७ पासून ते आत्तापर्यंत कायमस्वरुपी भेटीचे अंतर व चर्चेतील विचारविनिमय कमी दिवसाचा असायचा.परंतु या व्यापामुळे आबांच्या गाठीभेटी बऱ्याच वाढलेल्या आहेत.परंतु ते मतदाराची जनसेवा करीत असलेमुळे भेटीत जे समाधान
नाही ते त्यांच्या कामातून समाधान देत आहेत.त्याबाबत आम्ही समाधानी आहोत.श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सी.एन.जी. गॅस प्रकल्पाच्या भूमी पूजनाचे वेळेस देशाचे जाणते राजे मा.कृषि मंत्री तथा माजी मुख्यमंत्री तथा संस्थापक अध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवार यांना जगाचा मालक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला नेणारे आमदार हे पहिले लोकप्रतिनिधी आहेत. तसेच दर्शनापूर्वी व नंतरही विठ्ठल रखुमाई यांना प्रसन्न आहे.आबासाहेब हे शेतशिवारामध्ये ऊसाची लागण करताना, तसेच काळ्या आईची पेरणी करुन ओटी भरताना, टिपण रासन करताना व खिलार गाई जोपासतानाच त्यांचे गाव व आमचे गांव तालुका व जिल्हा व हितचिंतक आबासाहेब हि व्यक्ति नक्की लोकशाही प्रक्रीयेतील सर्व पद भोगून एकदा महाराष्ट्र शासनामध्ये मंत्री होणार हि खूणगाठ बांधून त्यापैकी ८५ ते ९० टक्के कृतीत आलेले आहे.राहिलेले ५ ते १० टक्के निती निसर्गाच्या पवित्र कृपेने मिळाल्याशिवाय राहणार नाही ही आमच्या आत्मविश्वासाची खुणगाठ आहे त्यातच तुम्हाआम्हा सर्व कार्यकर्त्यांचे समाधान आहे. तसेच त्यांना राज्य पातळी व देशपातळीच्या शासन प्रक्रियेत लवकरात लवकर संधी मिळो, हिच परमेश्वर चरणी प्रार्थना.ही जाणिव ठेवून आबांना अधिकाधिक काम करण्याची संधी मिळवून द्यावी, हि आबांना ४२ व्या वाढदिवसानिमित्त मी व माझ्या कुटूंबाच्या व आढीव गावच्यावतीने व मी ज्या ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेच्यावतीने आबांना शुभेच्छा देवून सर्वांनाच त्यांच्या कामाचा,उंचीचा कळस वाढता ठेवून त्यांना भरघोस पाठींबा देवून सहकार्य करुयात याच शुभेच्छा.आपला विश्वासू सहकारी शेतकरी श्री. दिनकर आदिनाथ चव्हाण मु.पो.आढीव ता. पंढरपूर मोबा.नं. ९३२६७२२७५१