
anant vichar, anant vichar news, anantvichar news portal, news, pandharpur, pandharpur news, photo, 29 may 2024, anant vichar, anant vichar news, anantvichar news portal, news, pandharpur, pandharpur news, photo, 6 may 2024, ३ लाख ५७ हजार ८३८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
अनंत विचार न्यूज दिनांक 7/5/2024
पोलींग पार्टींना मतदान साहित्याचे वितरण ; मतदान पथके मतदानस्थळी रवाना
पंढरपूर, दि.06:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत जिल्ह्यात सोलापूर-42 (अ.जा.) व माढा-43 लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवार दिनांक- 07 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. 42 सोलापूर लोकसभा मतदार संघातील 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 57 हजार 838 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 337 मतदान केंद्र असणार आहेत.
पंढरपूर मतदासंघातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना आज वितरित करण्यात आले असून, मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत.
पंढरपूर विधानसभा संघातील मतदान केंद्राकरिता ईव्हीएम मशीन व साधनसामुग्रींचे शासकीय धान्य गोदाम पंढरपूर या ठिकाणाहून वितरण करण्यात आले. लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, मतदार संघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंढरपूर विधानसभा मतदार संघातील 173 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.
सर्व मतदान केंद्रावर वाढती उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदारांना सावली मंडप व्यवस्था, बैठक व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी, दिव्यांग मतदारांना व्हील चेअर, ओआरएस पाकिटे, मेडीकल किटसह वैद्यकीय पथक, हिरकणी कक्ष, स्वयंसेवकांची मदत, मतदार मदत कक्ष, प्रसाधनगृह, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हिल चेअरसह इतर आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, नि:ष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.