
२०२४ पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा निवडणुक लढवणारच :- भगीरथ भालके, ANANT VICHAR NEWS, 15 February 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, group photo
भालकेंच्या पंढरपूरातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ह.भ.प.बोधले महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न.
अनंत विचार न्यूज दिनांक 15/2/2024
पंढरपूर प्रतिनिधी/
लोकनेते स्व.भारत भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन ह.भ.प.बोधले महाराज यांच्या शुभहस्ते पार पडले.यावेळी चेअरमन कल्याणराव काळे, युवराज पाटील,लक्ष्मण आबा पवार,मोहन कोळेकर,महेश साठे तसेच स्व.नानांचे सहकारी व पंढरपूर शहरातील आजी-माजी नगरसेवक,नागरिक, भालके प्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधत भक्तिमार्ग येथे युवानेते भगीरथ भालकेंच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या संर्पक कार्यालयाच्या माध्यमातून आता भगीरथ भालके आणि त्यांचे सहकारी पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेशी चांगल्या प्रकारे संर्पक ठेवत
नागरिकांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी अधिक आक्रमकपणे वाटचाल करतील असा विश्वास भालके सर्मथकांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. तसेच स्वर्गीय भारत नानांच्या जयंती निमित्त पंढरपुर येथे रेल्वे मैदान येथे २३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शेतकर्यांना कृषी, डेअरी व पशुपक्षी याविषयी तज्ञ मान्यवर मंडळी यांच्याकडून मार्गदर्शन माहिती देण्यात येणार आहे.अशी माहिती भगिरथ भालके यांनी दिल
भगीरथ भालके यांनी निवडणूकीचे रणशिंग फुंकले…..
राज्यात राजकीय भूकंप घडत असताना सोलापूर जिल्ह्यात ही विविध घडामोडी वेगाने घडत आहेत नुकताच पंढरपूर येथे १३ फेब्रुवारी२०२४ रोजी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा नवनिर्वाचित मतदारसंघाचे पहिले आमदार कै.भारत भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधून विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी सदैव जनतेच्या संपर्कातराहण्यासाठी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. या वेळी भगीरथभालके यांनी पाठीमागील
निवडणूकीचा मागोवा घेतला. व २०२४ च्या विधानसभा निवडणूक
प्रचाराचा शुभारंभ केला.आणि त्यांनी
जाहीर केले की मी आगामी २०२४ ची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आर.. या.. पार… म्हणूनच लढवणार असल्याचे निक्षून सांगितले.