
- अनंत विचार न्यूज दिनांक 14/11/2024
पंढरपूर प्रतिनिधी
काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांना मंगळवेढा तालुक्याचे नेते बबनराव आवताडे व युवा नेते सिद्धेश्वर आवताडे यांनी जाहीर पाठिंबा व संपूर्ण समर्थन दिले आहे. यामुळे आवताडे यांची ताकत भालके यांना मिळणार आहे तर मंगळवेढा तालुक्यात बबनराव आवताडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे याचा फायदा नक्कीच काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भालके यांना होणार आहे.
यावेळी युवा नेते सिद्धेश्वर आवताडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय घडामोडी घडल्यानंतर आम्ही आमच्या निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद करुन संपूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मंगळवेढा तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने आमच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामळे येणाऱ्या विधानसभेत भगिरथ भालके हेच विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके,बबनराव आवताडे,सिद्धेश्वर आवताडे व त्यांचे सहकारी मित्र परिवार, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.